चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात त्या वादळांना जे दास त्या धृवाचे;
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे;
हे जाणतो जायला वाटेल तेथ न्यारे.
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
मी मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म,पंत,जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।
आमुच्या मनामनात दंगते मराठी ।
आमुच्या रगारगात रंगते मराठी ।
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी ।
आमुच्या नसानसात नाचते मराठी ।
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी ।
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी ।
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी ।
आमुच्या घराघरात वाढते मराठी ।
येथल्या फुलाफूलात हासते मराठी ।
येथल्या दिशादिशात दाटते मराठी ।
येथल्या नगानगात गर्जते मराठी ।
येथल्या दरीदरीत हिँडते मराठी ।
येथल्या वनावनात गुंजते मराठी ।
येथल्या तरूलखात सादते मराठी ।
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ।
येथल्या नभानमधुन वर्षते मराठी ।
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी ।
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी ।
येथल्या चराचरात राहते मराठी ।
पाहुने जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।
थोड जगुन पहा
जन्माला आला आहेस थोड जगुन पहा
या जीवनात खुप दुःख आहेत
थोड सोसुन पहा
चिमुटभर दुःखाने कोसळून जावू नका
दुःखाचे काही पहाड तू चढून पहा
नंतर यशाची चव चाखुन पहा
अपयश येतं निरखुन पहा
घरट बांधन सोप असत
थोडी मेहनत करून पहा
जगन कठीन , मरणं सोप असत
दोन्हिँतल्या वेदना झेलून पहा
जीवन-मरण हे फक्त एक कोड असत
जाता-जाता ते सोडवून पहा
पुत्रास जन्म देण्यापूर्वी माते
पुत्रास जन्म देण्यापूर्वी माते
मज कवीचे म्हणणे ऐकशील का ?
या मुलाला तुझ्या शिवबाला
जिजाऊचे संस्कार देशील का ?
संतांची वाणी, शिवाजींची राहणी
या गोड मनावर बिँबवशील का ?
हर हर महादेव हे प्रभावी शब्द
त्याच्या ओठावर गिरवशील का ?
समर्थांचा बोध, सत्याचा शोध
ह्रदयी अंगार मढवशील का ?
माय भगिनींच्या रक्षणासाठी
तयास लढण्यास सांगशील का ?
अन्याया विरूद्ध पेटून उठण्यास
संघर्षाची ज्योत पेटवशील का ?
युद्धात अवेळी, संकट प्रसंगी
गनिमी कावा त्यास शिकवशील का ?
मराठी
नाद मराठी
नाळ मराठी,
सप्तसुरांचाताल मराठी.
काळजाचाठोका मराठी,
लक्ष्य गाठणाराझोका मराठी.
साद मराठी,
प्रतिसाद मराठी,
श्वास मराठी,
विश्वास मराठी.
साज मराठी,
आवाज मराठी,
माझा हरेकअंदाज मराठी.
वर्तमान मराठी,
भविष्य मराठी,
हरेक क्षण,
आयुष्य मराठी.
अवघा महाराष्ट्र माझा
लाल काळी माती इथली
अठरापगड जाती
कनखर आहेत मनं आमची
फडके झेँडा हाती
शिवरायांचे वंशज आम्ही
कृष्णा कोयना माता
विठूराया बाप आमचा
सह्रयाद्रि आहे सखा
इथे जन्मला शेर शिवबा
इथे जन्मली गानकोकिळा
इथे जन्मले लोकमान्य
इथे जन्मले ज्ञानबा तुका
अभेद्य आहे अजोड आहे
महाराष्ट्र माझा इथे
जन्मलो इथे वाढलो
पावन झाला जन्म आमुचा
अखंड वादळे झेलत राहील महाराष्ट्र
माझा अवघा महाराष्ट्र माझा
10 Best Marathi Poems