M4मराठी.com विशेष

Latest From M4Marathi Katta Blogs

348 Marathi Blog Posts
Page 1  [ 2 ]  [ 3 ]  [ 4 ]  [ 5 ]  [ 6 ]  [ 7 ]  [ 8 ]  [ 9 ]  [ 10 ]  [ 11 ]  [ 12 ]  [ 13 ]  [ 14 ] of 14 Next
 • "दिल्ली मध्ये सामुहिक बलात्कारची बळी ठरलेल्या मुली बद्दल अमिताभ बच्चन ह्यांनी हिंदी मध्ये लिहिलेल्या कवितेचे मराठी रुपांतर करून संपूर्ण महाराष्ट्र तर्फे हि कविता त्या मुलीला अर्पण करण्यात येत आहे, ....... तिचं दुखं समजून घेऊन ती गेल्यानंतर तिच्या आईसाठी व भारतासाठी तिचा संदेश ह्या कवितेतून मांडण्यात आला आहे :-

  आई .... खूप दुखं सहन करून, खूप दुखं देऊन .... तुला काही सांगून ...... मी जात आहे,

  आज माझ्या अंतयात्रेला मैत्रिणी माझ्या भेटायला येतील
  पांढर्या कापडात गुंढाळलेली मला बघून जिवंतपणीच मरून जातील
  आणि मुलीचा जन्म मिळाल्यामुळे पुन्हा एकदा दुखं करतील
  आई तू त्यांना एवढच सांग ..... राक्षसांच्या दुनियेत जपून वाग

  राखी साठी दादाचा हाथ रिकामा राहील .......
  माझी आठवण काढून डोळे तो भरून आणील
  कपाळावर त्याच्या टिळा लावायला जीव माझाही कासावीस होईल ..........
  आई तू दादाला रडू देऊ नकोस ... क्षणाक्षणाला मी बरोबर असल्याचा विश्वास गमावून देऊ नकोस

  आई, बाबा पण एकटे एकटे खूप रडतील ..... मी काहीच करू नाही शकलो अस म्हणून त्रास करून घेतील
  आई, हे दुखं त्यांना होऊन देऊ नकोस ....... स्वतः वर कोणताही आळ घेऊन देऊ नकोस

  आई तुझ्या साठी मी काय बोलू ...... दुखाला तुझ्या शब्दांमध्ये कसे तोलू ????

  आई लोक तुला सतावतील ....... मला जन्म देण्याची शिक्षा तुझ्या कपाळी लावतील
  आई सगळ सहन कर .............

  पण, अस नको म्हणूस .... " देवा पुढच्या वेळेस माझ्या पोटी मुलगी नको देउस "

  :-( :-( :-(
 • जुन्या काळचे सोनेरी दिवस, नितळ संस्कृती आपल्या हातून निसटून गेल्याची खंत मनाला राहून राहून वाटते, कधी कधी वाटतं निवांत बसावे आणि आपल्या हातून निसटून गेलेल्या त्या त्या क्षणांना डोळ्यांच्या कोंदणात साठवून घ्यावे. त्या विचारांचे जहाज घेवून आठवणींच्या मुक्त सागरात मनसोक्त हिंडून यावे.  लहानपणच्या हळव्या भावनांना  आठवताना आपण केलेल्या उत्साहवर्धक, रोमांचकारी गोष्ठी समोर आणाव्यात आणि त्या धुंद  करणाऱ्या वातावरणामध्ये चिंब भिजून जावे. परंतु आता ती दुनिया काळाच्या पडद्याआड गेल्याचे शल्य मनाला नेहमीच राहील. कुणीतरी अगदी खरं म्हटलंय -

                                     “रखरखत्या, खडबडीत  हातांनी आलंबलं घेणारी आता ती आय नाय,  

                                      आणि श्रद्धेने नतमस्तक व्हावे, असे कुठेच उरले आता पाय नाय !”

  तुम्हाला पण जुन्या आठवणीत रमताना पटत असेल कि खरंच, "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"

   

  श्री. साजीद पठाण   

   

  निघून गेलेल्या त्या दिवसाविषयी जेष्ठ कवी प्रा. अरुण म्हात्रे म्हणतात (प्रा. म्हात्रे सरांपुढे नतमस्तक होऊन )

   

  " ते दिवस आता कुठे ? जेंव्हा फुले बोलायची,

  दूर ती गेली तरीही सावली भेटायची,

  ते दिवस आता कुठे ? ....

   

  गवतही भोळे असे कि साप खेळू द्यायचे,

  सोडताना गाव त्यांचा कात हिरवी व्हायची,

  ते दिवस आता कुठे ? ....

   

  वर निळी कौले नभांची, डोंगरांची भिंत ती,

  ते नदी काठी भटकणे, हीच शाळा व्हायची,

  ते दिवस आता कुठे ? ....

   

  फाटके होते खिसे अन नोट ही न्हवती खरी,

  पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

  ते दिवस आता कुठे ? ....

  - कवी प्रा. अरुण म्हात्रे

 • स्वातंत्रपूर्व काळामध्ये बेचाळीसच्या लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लागले असताना क्रांतिसिंह नाना पाटील एका झोपडीमध्ये लपण्यास आसरा घेतात त्यावेळी एक वृद्धा आपल्या सुनेबरोबर त्यांना लपण्यास मदत करते आणि पोलीस आल्यानंतर माझी लेक जावई असल्याचे सांगून पोलिसांना चकवा देते. ह्या भावुकप्रसंगावर मराठी साहित्यातील वाल्मिकी गीतरामायणकार कवी. ग. दि. माडगूळकरांनी केलेली कविता मराठी कट्टा वरील मित्रांसाठी    -  "लपवलास तू का थेरडे

  झोपडीत या कुणी फरारी ?"

  "देवाशप्पत नाही दादा"

  दोन कापरे ओठ हलले !


  गळीत देह तो बाजूस सारून,

  झोत विजेचे आतच घुसले,

  "कोण दोन ते त्या खाटेवर ?"

  पुसे शत्रूचा एक शिपाही !


  लाजून, दबकून सांगे वृद्धा,

  "दादा माझी लेक जावई"

  अंधारातच खाटेवरुनी

  क्रांतिवीर तो बाजूस होई !


  नवोढेस त्या म्हणे

  "पुन्हा मी तुझ्याच पोटी येईन आई"

  नवोढेसही  गहिवर दाटे,

  शब्द फुटेना नयनी गंगा !


  "कूस फाडूनी तुझ्यासारख्या

  रणमर्दाला द्यावी जागा"

  सखोल डोळे गळू लागले

  कुरवाळूनिया त्या दोघांना !


  अश्रुखाली पुनःश्च भिजवी,

  वीराला ती वृद्ध अंगना ,

  बेचाळीसच्या बलवंतांना,

  असा लाभला दिव्य आसरा,

  लोकशक्तीच्या सामर्थ्यावर चिरंजीव हो मग सातारा

  कवी :- ग. दि. माडगुळकर

 • नुकताच ९ ऑक्टोबरला जागतिक "टपाल दिवस" साजरा झाला. आज सगळीकडे इलेक्ट्रिक मिडियामध्ये झालेल्या क्रांतीमुळे मोबाईल, फेसबुक, इंटरनेट मुळे होणारा तातडीचा संपर्क आणि या सर्वांमुळे मिळणाऱ्या सुविधा आपल्याला हव्याहव्याश्या वाटतात परंतु या सर्व संपर्क सुविधांमध्ये कालबाह्य होत चाललेला आणि हळव्या आठवणीतला -  पोस्टातून रोज त्याच्या अचूक वेळेवर येणारा पोस्टमन, त्याची ती पात्रांची खाकी पिशवी, खाकी दांड्याची मोठी छत्री, ते १५ पैश्याला मिळणारं साधं पत्र, अंतर्देशीय पत्र, बंद पाकीट, तातडीने मिळणारी तार, वेळेवर पोहोचणारी मनीओर्डर यांची आवर्जून आठवण या तारखेला झाली. आपुलकीच्या कुणीतरी पाठवलेल्या पत्रातून येणारा त्याच्या सहवासाचा सुगंध आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये हरवलेला दिसतो. आज फेसबुक वरून आपल्या मुलाचा किंवा अप्ताचा फोटो पाहून त्या फोटोला आपण "लाईक" करतो, किंवा त्याच्याशी ऑनलाईन च्यटींग करतो, मात्र पत्रातील मजकूर वाचून, त्यातील अक्षर पाहून मुलाचे मस्तक चुम्बल्याची जाणीव कोणे एके काळी हे टपाल किंवा पत्र करायचे हे कदाचित आता सांगून पटणार नाही. पूर्वी अनेक साहित्यकांनीही ह्या पत्रव्यवहारावर अनेकदा लिहून झालेले आहे.
  कवी नारायण सुर्वे यांनी अनुवादित केलेली कविता मनाला एका लयीत झुलवत ठेवते. त्यांनी "पत्रात लिवा" ह्या कवितेमधून संपूर्ण सचित्र डोळ्यापुढे उभे केलेले आहे. ही कविता मराठी अड्ड्यावरील वाचक मित्रांसाठी ज्यांनी आज ही "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी" म्हणत
  टपाल / पत्र किंवा भारतीय पोस्ट विभाग यासर्वांच्या आठवणींचे मोरपीस आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवले आहे.

  श्री. साजीद यासीन पठाण
  दह्यारी
  जिल्हा - सांगली                                            

  असं पत्रात लिवा

   

  तुम्ही सुखात समदी ऱ्हावा, असं पत्रात लिवा

  कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठ़ुमकते रस्त्यावर

  संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर

  पाणी आणायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा


  शंभर रुपयांचा हिसाब मागता, मीच का एकलीनं खाल्ले

  लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले

  दुधवाल्याचे पंचवीस दिले, असं पत्रात लिवा


  पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्कटं झाली खेप

  बेबी झाली मोठी, तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप

  आमी सगळ्यांनी ऐकू का नको, असं पत्रात लिवा


  बाळाला आला ताप आणि खोकला, प्रायव्हटेला घेऊन गेले

  शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले

  त्याला जे. जे. ला नेऊ का नको, असं पत्रात लिवा


  नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो

  तुझ्या बहिणीला मारतो नवरा, सगळ्याजणी धमकावतो

  तिला सोडवायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा


   बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते

  आयाबायांनी शिकायला पायजे, वस्तीच अख्खी बोलते

  मी बी शिकायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा


  जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे

  मिळून मिसळून राह्याचं सोडून, धर्माच्या नावावर दंगे

  समद्या वस्तीला समजावू का नको, असं पत्रात लिवा


  कोन्या मेल्यानं तुमा कळीवलं मी ठ़ुमकते रस्त्यावर

  मिटींगला जाते, मोच्र्याला जाते, त्याविना कसं जगणार?

  या तुमीबी साथ द्यायला, असं पत्रात लिवा


  - मूळ हिंदी : शहनाज शेख व गीता महाजन

                                                                        स्वैर अनुवाद : नारायण सुर्वे
 • मुखवट्यामागचे चेहरे ओळखू येत नाहीत हा खरंतर ईश्वराने निवडलेला शांती, अमन चा मार्ग असावा कारण जर दुसऱ्याच्या मनातील वाचण्याची कला अवगत झाली असती तर सर्व मानव जात आज भांडताना दिसली असती. म्हणून एखाद्याचे दुःख पाहून आतून आनंद झाला असतानाही एखाद्याला रडावं लागतं, आणि एखाद्याचा उत्कर्ष पाहून मनातली इर्षा दडवून एखाद्याला त्याच्यासोबत हसावं लागतं. ह्या जीवनरूपी रंगमंचावरील नाटक प्रत्येकाला मिळालेल्या पात्राप्रमाणे वटवावं लागतं.
  - साजीद पठाण
 • आज सगळीकडे बालमजुरी संदर्भात नवनवीन कठोर कायदे अस्तित्वात येत आहेत , परंतु माझ्या मनामध्ये बालमजुरीच्या मुळातील  हतबलता , असहायता या बाबत काही अनुतीर्ण प्रश्न आहेत, ज्यांनी माझं मन अस्वस्थ होतं. बालमजूर, बालकायदे हे सर्व ठीक, मात्र कुणी आपण होऊन आपल्या लेकराला बालमजुरीच्या गर्तेत ढकलत नसेल हे ही तितकेच खरे ! या सर्वांचा विचार करत असताना मला ही "बालमजूर" कविता सुचली. मला यातून बालमजुरी चे समर्थन करावयाचे नाही, तर प्राप्त परिस्थिती समोर ठेवण्याचा माझा प्रयत्न माझ्या वाचक मित्रांनी समजून घ्यावा. ही विनंती.

                            श्री. साजीद पठाण
                                दह्यारी
                            जिल्हा -  सांगली

  बालमजूर

  श्री. साजीदयासीनपठाण

   

  आठ तासांच्या चक्रातबाबा

  माझंबालपण हरवून गेलं,

  अकाली प्रौढत्व दिलंततुम्ही

  माझंखेळायचंराहून गेलं ........!

   

  दारिद्र्याचा बजावण्याखड्डा

  लहान भावाला संगती न्हेलं,

  हुशारीची मलाच वाटली लाज

  दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........!

   

  यशाची माझ्या देऊन हमी

  मास्तरांनी हुशारीचंदिलंदाखलं,

  म्हणालात तुम्हीत्यानला

  पोटी माझ्याचार मुलं- ...........

   

  इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर

  माझंपोरगचका अडाणी ऐकलं,

  शिकूनच काभाकरी मिळते

  किती अडाणीउपाशी मेलं........?

   

  माझंहातपाय थकलंआता

  करील बहिणींचहात पिवळं,

  परअपराधाची बोच मनी

  कुस्करलंदारिद्र्यानं बालपणकोवळं ........!

   

  (मीच म्हणालो, त्यावेळी बाबाकि ........)

  वाईट नका वाटून घेऊ

  बाबा- मला शिक्षण बास झालं,

  बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा

  पोटामधला डबरा खोलं........!!

  पोटामधलाडबराखोलं ........!!

   

  श्री. साजीदयासीनपठाण


 • सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
  गोड बोलण्यानंच होते
  सगळ्या प्रेमकथांची अखेर
  मटार सोलण्यानंच होते!

  प्रेमात दोघं असतात तेंव्हा
  सगळं गुलाबी वाटत असतं
  एकमेकांना प्रेमानं दिलेलं
  पाणीही शराबी वाटत असतं
  प्रेमकथांची सुरुवात अशीच
  पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
  प्रेमकथांची अखेर मात्र
  (तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!
 •          लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव  सुरु केला होता त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. सार्वजनिक उत्सव समाजातील एकात्मता वाढीस मदत करतात हे ते पूर्णपणे जाणून होते. पुण्यामधील गणेश उत्सव काही प्रमाणावर त्याची ग्वाही आजही देतात पण मुंबईची गोष्ट  वेगळीच आहे. पुण्यातील मराठमोळ्या लोकांनी आपल्या रूढी-परंपरा आता आतापर्यंत जपून ठेवल्या होत्या. पण मुंबईला ते शक्य नव्हते. कारण हि तसेच होते. मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी बनत चालली होती. कापडाच्या गिरण्या हि मुंबईची ओळख होती आणि गिरणगावातील चाकरमानी जनता हि संपूर्ण महाराष्ट्रातून आली होती .

        

              तेव्हा सुद्धा कोकणातून आलेला मुंबईतील गिरणी कामगार गणपती साठी गावी जात असे फरक इतकाच कि आता रेल्वे सुविधा उपलब्ध आहे.स्वातंत्रोत्तर काळात मुंबई हि बहुभाषिक बनली आणि त्यानुसार मुंबईमधील  गणेश उत्सव बदलत गेला. मार्केटिंग आणि जाहीरातीच्या काळात गणपती जास्तीत जास्त कमर्शियल बनत गेला. मोठमोठाले गणेश मंडळ आता लाखो भाविकांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी उंचच उंच गणेश मुर्त्या बनवून घेवू लागले. काही मंडळानी नाविन्य आणण्यासाठी आपल्या मंडपात नीर निराळे देखावे तयार केले. हलती चित्रे आणि कथानक हे तर सर्वसामान्य होऊ लागले. गणपती काळानुसार हाय टेक होवू लागला. मिसकॉल  द्या आणि गणपती च्या फोटोवर फुले अर्पण करा अशाप्रकारचे कार्यक्रम न्यूज वाहिन्या दाखवू लागले. इंटरनेट वरून आता नवसाच्या पूजा आटोपता येवू लागल्या. पूर्वीच्या कापडी जाहिराती जाऊन आता सगळीकडे फ्लेक्स च्या फलकांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भरून गेली. काही ठिकाणी तर मोठाले डिजिटल बोर्ड्स दिसू लागले. लालबाग - परळ हे मुंबईतील गणपती उत्सवाचे केंद्र आता जगभर प्रसिद्ध झाले होते. 


               काळ  झपाट्याने बदलतो. इतका कि कधी कधी आपण स्वतःला काळाच्या मागे पडलेलो बघतो. आम्ही शाळेत असताना आम्हाला दहा एक आरत्या तोंडपाठ होत्या. आता तर सीडीवर दोनेक आरत्या वाजवूनच आरत्या संपवतात. पूर्वी अकरा दिवस न थकता न कंटाळता गणरायाची सेवा व्हायची; आताच्या बिझी शेड्युलमध्ये दीड दिवसातच लोक वैतागतात. एव्हाना घरगुती गणपतीसाठी सुद्धा 'बजेट बनवावे लागते. पूर्वी गणपतीसाठी मखर बनवण्यासाठी लोकांकडे पुरेसा वेळ होता. आता महिनाभर पूर्वीच मखरची ऑर्डर द्यावी लागते. गणेश मूर्ती तर सहा सहा महिने आधीच बुक होतात कारण नंतर मनासारखी मूर्ती मिळत नाही. घरगुती प्रसादामध्ये आधी लोक केळी, सफरचंद सारखी फळे देत असत. आता फळं एवढी महाग झाली आहेत कि लोकांना चण्या-फुटाण्यांचा प्रसाद द्यावा लागतोय. पूर्वी गणेश दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावणाऱ्या लोकांच्या मनात इतका श्रद्धा भाव असायचा कि डोळे आपोआप मिटून हाथ जोडले जायचे. आता गणपतीचा फोटो घेण्यासाठी हाथ मोबाईलवर असतो आणि गणरायावर  कॅमेऱ्यांचे फ्ल्याश पडत असतात.काही लोक फक्त गर्दी बघण्यासाठी आणि मुंबईची सो कॉल्ड स्पिरीट बघण्यासाठी लालबागला जातात. मुंबईतील गणेश उत्सवाबद्दल आकर्षण असल्यामुळे जमलेली लोक कमीच बघायला मिळतात. 

                

             असो, तर सांगायचे तात्पर्य हेच कि देवावरची श्रद्धा असल्यामुळे मनोभावे दर्शनासाठी जमणारे भाविक आणि मुंबईची गर्दी या दोन्ही एकाच वेळी बघण्याचा योग गणेश उत्सवाच्या वेळी नक्की येतो. तरीही गणेश उत्सवाचे वातावरण आणि उत्सवातील लोकांचा उत्साह पाहण्यासाठी सर्वांनी गणेशोत्सवात एकदा तरी नक्की जावे आणि लालबागच्या राजाचे दर्शन घ्यावे. 


                                      गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!! 

 • एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
  वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.


  लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
  भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
  हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
  इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
  गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
  "मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
  किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
  ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
  हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
  घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
  गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
  छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
  गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
  हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
  धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
  शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
  झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
  अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
  कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
  हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......  खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.


  पाखरे जर दिवस असते
  आभाळी मी सोडिले नसते
  फिरूनी त्यांना ह्रदयात मी
  कोंडुन ठेविले असते
  ते पाखरू मागे न वळले
  मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
  जे परतुन कधी ना आले...  =======================================================================
  =======================================================================
  मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा
 • गम्प्या : काय रे ? कृपया थोड्या वेळाने डाइल
  करा असे वाक्य महिलेच्याच आवाजात का असते?
  झम्प्या : अरे...कारण कोणीच पुरुषांच म्हनन ऐकून
  घेत नाहीत.......
 •  सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं..

  त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं..

  आपल्या मनासारखं कधीचघडत नसतं..

  हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं..

  ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं..

  दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं,
  दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का..??

  ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का..??

 • एक मुलगी एक मुलगी होती म्हणायची मला मंद,

  पण माझ्या कविता वाचणे हा होता तिचा छंद.


  मंद म्हणायची, चंपक म्हणायची आणि म्हणायची वेडा,

  कानाखाली आवाज काढेल ती, अगर किसीने उसको छेडा.


  मी म्हणायचो तीला मुल कशी असतात सांग,

  ती म्हणते त्यांच्या नानाची टांग.


  शब्दात सांगता येणार नाही असे आमचे नाते,

  गाणं म्हणायला सांगितल्यावर म्हणते मी कुठे गाते.


  ती बरोबर असताना मला नाही येत झोप,

  ती मला आवडायची, जस्ट आय होप.


  तिच्यावर कविता लिहिताना आठवली मला माझी अधुरी भेट आपली,

  आणि पुन्हा एकदा पाणी होऊन माझ्या डोळ्यात दाटली.


  ती ओंनलाईन यायची मी बघायचो वाट,

  इतरांपेक्षा वेगळी होती, वेगळाच तिचा थाट.


  एकेदिवशी गप्पा मारत बसलो मला झालं लेट,

  कधी झोपलो, सकाळ झाली चालूच राहिलं नेट.


  वाटत होत तीला एकदा तरी पहाव,

  मैत्रीच्या रिंगणात असंच फिरत रहावं.

 • ♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
  प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
  प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
  ( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
  प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ???
  प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥
 • हृदय स्पर्शी प्रेम कथा ♥
  कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का,गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८०मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही. काय समजतोस तू कोण स्वताला?
  अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता...
  मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशी

  ल मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान
  नाहीस अजून.
  सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीतआल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर.. ...
  मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांचएकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायचीपण.
  कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणीघातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल.
  "अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात,म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीततुझ्यासाठी."
  "मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मलावाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावरम्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत."
  "आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत.
  नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग.....
  "बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला
  फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार
  त्या ट्रक वर जावून जोरात आदळली.
  माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामीझाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय
  झाले मला काहीच कळले नाही...
  कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीचसवय
  होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण
  वाढवण्याची.
  तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता...
  "अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का?
  अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." "हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशीवाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वरअजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू....
  " i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न
  सांगितले सचिनला...
  "i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...बावळट कुठली."

 • !!!==–..__..-=-._;
  !!!==–..@..-=-._;
  !!!==–..__..-=-._;
  !!
  !!
  !!

  HAPPY INDEPENDENCE DAY.in advnce

  SAARE JAHAN SE ACCHA
  HINDUSTAN HAMARA


  IN ADVANCE

 • *********.–,_
  ********['****'\.
  *********\*******`''|
  *********|*********,]
  **********`._******].
  ************|*****\
  **********_/*******-’\
  *********,’**********,’
  *******_/’**********\*********************,….__
  **|–”**************’-;_********|\*****/******.,’
  ***\**********************`–.__,’_*’—-*****,-’
  ***`\******** 15th August ********\`-’\__****,|
  ,–;/ ********************************/*****.|*,/
  \__*** HAPPY INDEPENDENCE DAY *’|****/**/*
  **./**_-,*************************_|***
  **\__/*/************************,/********”
  *******|**********************_/
  *******|********************,/
  *******\*www.smsdose.com*/
  ********|**************/.-’
  *********\***********_/
  **********|*********/
  ***********|********|
  ******.****|********|
  ******;*****\*******/
  ******’******|*****|
  *************\****_|
  **************\_,/
  A Very Happy Independence Day To all of you!
 • पोरी महागात पडतात!!
  पोरी महागात पडतात
  खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
  तुम्हाला काय,मला काय
  सर्वांनाच पोरी आवडतात
  जास्त जवळ जाऊ नका
  कनाखाली ओढतात
  खरच सांगतो पोरंनो,..............

  आज हा उदया तो
  रोज नवा शोधतात
  नुस्तच ठेउन वासावर
  खीसा मात्र कापातात
  खरच सांगतो पोरंनो,................

  हा नडतो,तो भांडतो
  दहा जन हनतात
  पोरगी राहते बाजूला
  पोरच भांडनात पडतात
  खरच सांगतो पोरांनो,....................

  कधी इकडे,कधी तिकडे
  नुस्तच चोरून बघतात
  आणि आपण लागलो मागे की
  सॉरी म्हणुन जातात
  खरच सांगतो पोरांनो,....................

  याला फीरव,त्याला फीरव
  दहा लपडयात अडक्तात
  कधी धुन्दित,कधी मंदित
  नको तस लूडकवतात
  खरच सांगतो पोरांनो,...................

  कधी सेंट,कधी लिपस्टिक
  नुस्तच पावडर थापतात
  अन आपण मरला डोळा की
  बापाला जाउन सांगतात
  खरच सांगतो पोरांनो,....................

  कधी सिनेमा,कधी नाटक
  नुस्ताच खीसा बघतात
  अन खीसा खाली झाला की
  दूसरा बकरा शोधतात
  खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
  पोरी महागात पडतात
  खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
  तुम्हाला काय,मला काय
  सर्वांनाच
 • कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


  समजून सगळे

  नासमज बनतात मुली

  चांगल्या चांगल्या मुलांना

  वेडयात काढतात या मुली

  अनोलखी पुरुषाला

  दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

  पण आपल्याच वडलान्ना

  काका का म्हणतात या मुली ,

  बोलायला गेलो तर

  लाइन मारतोय म्हणतात या मुली,

  मग नाहीच बोललो की

  शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

  मुद्द्याच बोलण थोड़च असत

  तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

  जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

  तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

  पावसात भिजायच तर असत

  तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

  थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

  मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

  वाचून ही कविता

  चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

  मग (कदाचित) विचार करून मनात...

  थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...
   
 • तुला पाहिलं की
  अस काय होवून जात
  माझ मन मला
  कस विसरून जात
  तुझ्या डोळ्यात पाहून
  भान हरवून जात
  तुला घेवून मन
  नभात उडून जात
  तुझ्या केसात हरपून
  मन गुंतून जात
  त्या रेशीम जाळ्यात
  मन गुंफून जात
  तुझ्या गोड हसण्यान
  मन फसून जात
  गालावरच्या खळीवर
  मन खिळून जात
  तुला पाहिलं की
  मन वेड होत
  कळत नाही कस
  मनात प्रेम उमलून जात .
 • तुझा होऊन जगण्यात
  वेगळीच मजा असते
  दिवसाही चांद रातीत
  मन भटकत असते
  उन्हासही सावली समजून
  अंगावर घेत असते
  हवं तेव्हा पावसात
  मन भिजत असते
  क्षितीजाच्या पलीकडे
  मन जात असते
  पंख लेवून प्रीतीचे
  तुझ्यासवे उडत असते
  तुला श्वासात भरून
  मस्त जगत असते
  स्वप्नात का होईना
  मिठीत पाहत असते .

 • jaovha tU javaLM haotasaM

  tovha p`omaacaI ikMmat kLlaI naahI

  dUr gaolyaavar tuJyaa AazvaNaIMiSavaaya

  ekhI ra~ maI inajalaI naahI

 • AazvaNa

   

   

   

   

  “spSa- tuJyaa hataMcaa”

  AazvaNa do}na jaatao¸

  prtIcaa sauya- hI

  hllaI caTko do}na jaatao...

   

  katrvaoLI kahI xaNa

  jaunyaa AazvaNaI dotat¸

  saMQyaakaLI kajavao hI

  hllaI maSaalaI poTvaUna jaatat...

   

  maSaalaIMcyaa p`kaSaat maga

  ra~ yao}na zopto¸

  saaKr Jaaopocyaa svaPnaat hI

  hllaI tIca yao}na poTto...

   

  ¡kvaI :¹ p`SaaMt paTIla£

   

 •    

  inayatIcyaa manaatlaM

  kQaI AaoLKtaM yaotM kaM

  kayaM GaDolaM jaIvanaat

  saaMgata yaotM kaM

  saarIpaTcaa KoL maaMDUna

  tI KoLtM Asato

  kQaI kayaM hao[-laM

  kuNaasaM za}k nasato

  kQaI GaDtM manaasaarKMM

  kQaI GaDtM nasatM

  pNa kayaM GaDNaarM ho

  inayatIlaaca za}k AsatM   

  saaro Qaagaodaoro

  itcyaa hatatM AsatatM

  AapNa ptMgaasaarKo

  naBaat ]DtM AsatatM

  mhNaUna gaiNat caUktM

  AayauYyaatlaM

  kuNaalaaM za}k AsatM

  inayatIcyaa manaatlaM.

  ………………………………

   Page 1  [ 2 ]  [ 3 ]  [ 4 ]  [ 5 ]  [ 6 ]  [ 7 ]  [ 8 ]  [ 9 ]  [ 10 ]  [ 11 ]  [ 12 ]  [ 13 ]  [ 14 ] of 14 Next


Copyright 2011-12 m4marathi.com