Ultimate Marathi Recipes

 • अंबाडीची भाजी (पालेभाजी)
  साहित्य : एक जुड्डी अंबाडी पालेभाजी , १/२ वाटी तांदुळाच्या कण्या , ५,६ लसूण पाकळ्या , ३,४ लाल हमरच्या , फोडणीचे साहित्य तेल,मोिोरी,हजरे,हिग,िळद , चवीनुसार मीठ व गूळ
  कृती :
  लसणाची फोडणी घातलेली अंबाडीची भाजी व ज्वारीची भाकरी िा माझा अहतशय आवडता मेन्यू आिे. . आहण म्िणूनच मीच त्याची झटपट िोइल पाककृती आज येथे देणार आिे. अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत , व्यवहथथत धुवुन बाररक हचरावीत. एका भांड्यात एक वाटी तांदुळाच्या कण्या घेउन त्या धुवून घेऊन त्यात अडीच ते तीन वाट्या पाणी टाकुन वर हचरलेली आंबाडी टाकावी व भांडं कुकरला लावावं. तांदुलाच्या कण्यबरोबरच अंबाडी मथत हशजते व एकजीव िोते. कुकर झाल्यावर तांदळाच्या कण्या व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात. कढईत मोिरी, हिग, िळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की हमरच्या टाकाव्यात, थोडं हतखट टाकावं. घोटलेले कण्या व अंबाडीचं हमश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक दरदरून वाफ द्यावी.
  िी भाजी त्यावर लसणाची फोडणी टाकून ज्वारीचा भाकरी बरोबर चापावी.
 • ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी
   
  नारळ फोडून त्यातील चव खवून काढून झाल्यावर करवंटीच्या आतील भागास न खवलेले जे खोबरे चिकटून शिल्लक राहेलेले असते ते दुसर्याूदिवशी सुरीने अगर चमच्याने काढून घ्यावे व त्याचाच  उपयोग करुन  छान खमंग अशी चटणी  कशी होते ते मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे.
   साहित्य : एक वाटी नारळाच्या करवंटीस आतील बाजूस शिल्लक (न खवलेले) राहिलेले ओले खोबरे (बारीक करून घ्यावे), ५-६ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे , चवीपुरते चिंचेचे बुटुक ,चमचाभर भाजलेले तीळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिराचांचे तुकडे व मीठ आणि साखर , कढीपत्त्याची ४-५ पाने (बारीक चिरून) , फोडणीसाठी तेल , जिरे , मोहोरी , हिंग व हळद .
  कृती : गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवून तेल तापल्यावर त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे,लसणाच्या पाकल्याचे तुकडे,जिरे,मोहोरी,हिंग,हळद,कढीपत्त्याची पाने ,तीळ घालून परतवून घ्यावे व मग त्यातच ओले खोबरे घालून पुन्हा एकदा परतावे,मग चवीनुसार साखर व मीठ घालून साखर विरघळेपर्यंत पुन्हा परतत राहावे पाच मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून , गार झाल्यावर ही चटणी एका काचेच्या बाउल मध्ये काढून ठेवावी.
  ही चटणी दोन तीन दिवस छान टिकते. नंतर मात्र सुक्या खोबर्यास व त्यामुळे ह्या चटणीस खवट वास येण्याची शक्यता आहे.
 • साहित्य : आदल्या रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या दोन-तीन शिळ्या पोळ्या, चवीपुरते लाल तिखट ,मीठ व आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल. 
  शिळ्या पोळींची वेफर्स किंवा खारी शंकरपाळी करण्यासाठी किमान एक –दिड तास आगोदर शिळ्या पोळ्यांचे कात्रीने शंकरपाळ्याच्या आकारात काप करून घेऊन ते तिखट मिठाच्या पाण्यात पांच मिनिटे बुडवून ठेऊन बाहेर काढून वाळवून घ्या. आता गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात ते काप शंकरपाळ्यासारखे किंवा वेफर्स सारखे तळून घ्या.
  सकाळी किंवा दुपारी गरम चहाबरोबर ही खारी शंकरपाळी किंवा वेफर्स खायला छान लागतात.   
 • साहित्य : मध्यम आकाराचे ४-५ बटाटे,एक  वाटीभरून कोवळे ताजे  मक्याचे दाणे (अमेरिकन पिवळे असतील तर उत्तमच),३- ४ हिरव्या मिरच्या,साधारण बोराएवढा आल्याचा तुकडा,४- ५ लसूण पाकळ्या,४ - ५ कडा काढलेले ब्रेड स्लाईस,४-५ चमचे बारीक रवा,चवीनुसार मीठ व लिंबाचा रस आणि तळणीसाठी तेल
  कृती :
  बटाटे व मक्याचे दाणे उकडून घ्या, चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका, बटाटेही कोरडे होऊ द्या,साले काढून कुस्करुणन घ्या (स्मॅश वापरुन),पावाचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या, हा गोळा किसलेल्या बटाट्यांत मिसळा.
  आले, लसूण, मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा. मीठ व लिंबाचा रस चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पाहा.
  एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर कमी तेलात शॅलोफ्राय करा.
 • साहित्य :  एक मध्यम स्लाइस ब्रेड , दोन वाट्या बेसन पीठ , दोन टे.स्पून तांदळाचे पीठ,दीड वाटी झणझणीत तिखट अशी बटाट्याची स्मॅश केलेली भाजी(भाजी तळल्यावर तिखटपणा कमी होतो) , चवीनुसार मीठ, मीठ, हिंग,हळद ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर ,तळणीसाठी कढई व तेल.

  कृती :  प्रथम एका बाउलमध्ये  बेसन व तांदळाचे पीठ  घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, हिंग  ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात जरुरीप्रमाणे थोडे थोडे पाणी घालावे. मात्र भज्यासाठी असावे तसे पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे व तेल चांगले कडकडीत तापल्यावरच त्यात  ब्रेडच्या कडा काढून टाकून त्रिकोणी अगर चौकोनी तुकडे कापून घेऊन एका तुकड्यावर स्मॅश केलेली बटाट्याची भाजी लावावी व त्याचेवर दूसरा तुकडा ठेऊन  भिजवलेल्या पिठामध्ये बुडवून घेऊन भज्यासारखे तळून घ्यावे. ही पावाची भजी हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावी.

 • चवळीची उसळ
  chawali.jpeg
  साहित्य : १२५ ग्रॅम चवळी , एक चमचा जिरे , एक मोठा सुक्या खोबर्या्चा तुकडा , फोडणीसाठी तेल , मोहरी , हळद , हिंग , दोन चमचे गोडा मसाला , चवीनुसार लाल तिखट , गूळ किंवा साखर व मीठ ,स्वादासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
  कृती :  चवळीची उसळ करायचे आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात  चवळी भिजत घालावी व सकाळी एका चाळणीत उपसून निथळत ठेवावी. गॅसवर मोठा सुक्या खोबर्या्चा तुकडा भाजून घ्यावा व जिरे आणि खोबरे ह्यांचे मिक्सरमधून वाटण करून घ्या , गॅसवर एक पातेले फोडणीसाठी तेल घालून ते चांगले तापल्यावर त्यात मोहोरी टाकावी व टी पूर्ण तडतडल्यावर हळद व हिंग घाला व थोडे परतून घ्या व मग त्यात चवळी घालून पुन्हा एकदा परतून घ्या व जसा रस हवा असेल तसे पाणी चवीनुसार  लाल तिखट , गूळ किंवा साखर व मीठ व जिर्याा-खोबर्यातचे वाटण घालून झाकण ठेवून चवळी शिजवून घ्या. चवळी छान शिजल्याची खात्री झाल्यावर उसळीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवा म्हणजे उसळीलाकोथिंबीरीचा छान वास लागेल.
 •    मक्याचा उपमा
  साहित्य -मक्याची ४ कणसे,  चांगले   तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर  ई . घालू शकतो . )
                                                                                                                                                                                                                                   
  कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची  बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व  उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा , व  serve करावे   कोथिम्बिर घालावि.
     
 • गुळ पापडी -

  साहित्य :- एक वाटी कणिक ,तीन चमचे साजूक तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ .
  इतर साहित्य -वेलचीपूड ,भाजलेला खोबरं कीस,ड्रायफ्रूट चे तुकडे घालू शकतात .
  कृती -gas चालू करून कढइत साजूक तुपावर कणिक चांगली खरपूस भाजणे ,gas बंद करून त्यात किसलेला गुळ घालणे .नीट मिश्रण करावे . व खावे ,खिलवावे .
 •  कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची  बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व  उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा , व  serve करावे   कोथिम्बिर घालावि. :) :)
 •    फ्लावरच्या     करंज्या -
    अर्धा किलो  किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी .   घट्ट  मळलेली कणिक . अर्धा  किलो तेल .
       फ्लावरची  वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून
  करंज्या करणे . व  तळणे . गरम  serve करणे .

   
 • दलिया खिचडी रेसिपीज मराठीत : daliya khichadi recepi marathi language .


  दलिया खिचडी

  साहित्य :-
  १)   एक वाटी दालीयाचा रवा शिरवून
  २)   अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  ३)   तीन-चार हिरव्या मिरच्या
  ४)   एक मोठा चमचा साजूक तूप
  ५)   एक चमचा जिरं
  ६)   उकडलेल्या बटाटयाच्या फोडी एक वाटी
  ७)   मिठ , साखर , अर्धा कप दुध .
  कृती :-
  १)   तुपाची जिरं-मिरच्या घालून फोडणी करावी .  बटाटयाच्या फोडी घालून परताव्या .
  २)   शिजवलेल्या दालीयात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट घालून कालवाव .
  ३)   हे मिश्रण बटाट्यात घालून ढवळावं .  दुध घालून एक वाफ आणावी .  ( एकदा दलिया शिजवलेला असला की बाकीची कृती मायक्रोवेव्हमध्येही करता येईल . )  Searches related to daliya khichdi recipe image
  daliya khichdi recipe sanjeev kapoor
  dalia recipe sanjeev kapoor
 •                            
  कच्च्या फणसाची भाजी

  साहित्य :-
  १)   एक कच्चा फणस
  २)   मध्यम आकाराचे कांदे तीन-चार
  ३)   लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच
  ४)   सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ
  ५)   तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा
  ६)   धने-जीऱ्याची पूड दोन चमचे
  ७)   काळा मसाला दोन चमचे
  ८)   कोथिंबीर अर्धी वाटी
  ९)   अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल
  १०)    मोहरी , हळद , चवीपुरत मीठ .
  कृती :-
  १)   फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं.  हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .
  २)   तीन कांदे भाजून घ्यावे .  सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत .  ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .
  ३)   फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा .  मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .
  ४)   फोडणीतच हळद घालावी .  भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा .  भाजी चांगली शिजवून घ्यावी .
  ५)   भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो .  चवीपुरत मीठ घालावं .
  ६)   भाजी काढल्यावर वरून शोभेसाठी थोडी कोथिंबीर , लिंबाच्या गोल चकत्या पसराव्या .
 •   भरली वांगी                       

  साहित्य :-
  १)   छोटी वांगी पाव किलो
  २)   गोड मसाला तीन चमचे
  ३)   तिळाचा कूट सात-आठ चमचे
  ४)   भाजलेल्या खोबऱ्याची पूड सात-आठ चमचे
  ५)   मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन
  ६)   लाल तिखट आवडीप्रमाणे
  ७)   फोडणीच साहित्य , मेथीचे दाणे पाव चमचा
  ८)   तेल अर्धी वाटी , अर्धी वाटी कोथिंबीर
  ९)   लसूण पाकळ्या पाच-सात , आलं पाव इंचापेक्षा कमी .
     मसाल्यासाठी :-
  १)   कांदे उभे चिरून तेलावर परतून घ्यावे
  २)   नंतर आलं , लसूण , कांदा वाटून घ्यावा
  ३)   या वाटणात तिलकूट , खोबऱ्याचा कूट
  ४)   मिसळून त्यात चवीपुरत मीठ घालावं
  ५)   त्यातच भरपूर कोथिंबीरही घालून सारण तयार करावं ,
  कृती :-
  १)   वांगी धुवून घ्यावीत .  त्याचे देठ काढू नये .  देठ खात नाहीत पण देठासकट भाजी छान दिसते .
  २)   वांग्याच्या रुंद गोलाकार भागावर + असा छेद देणे .  या छेदामध्ये वरील मसाला भरावा . 
  ३)   सगळी वांगी भरल्यावर प्रेशर पैन अथवा पसरट भांड्यात अर्धी वाटी तेलाची फोडणी करावी आणि त्यात एक-एक वांगं व्यवस्थित सोडावं . 
  ४)   प्रेशरपैनचं झाकण लावल्यास , पैनचा आवाज आल्याबरोबर गैस बंद करावा .  नाहीतर भाजी जास्त शिजेल . 
  ५)   पसरट भांड्यात वरीलप्रमाणे वांगी ठेवून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी .  वांगी शिजण्यास वेळ लागत नाही .
  ६)   वऱ्हाडात काही ठिकाणी हीच भाजी आंबट-गोड करतात .  तेव्हा त्यात चवीपुरता गूळ व चार चमचे चिंचेचा कोळ घालतात . 
  ७)   भाजी भांड्यामध्ये काढल्यावर वरून मेथीचा तडका द्यावा , एकदम खासच  लागते .
  ८)   ज्वारी अथवा बाजरीचा भाकरीबरोबर आणि तोंडी लावायला कच्च्या कांद्याच्या फोडी असल्यास तबियत खुश !   
 •                              
   लाल भोपळा

  साहित्य :-
  १)   लाल भोपळा अर्धा किलो
  २)   खसखस एक चमचा
  ३)   लसूण पाकळ्या सहा-सात
  ४)   आलं पाव इंच
  ५)   मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन
  ६)   खोबऱ्याचा कीस पाव वाटी
  ७)   हळद , तिखट अर्धा चमचा
  ८)   तेल पाव वाटी , कोथिंबीर पाव वाटी
  ९)   चविपुरत मीठ .
  कृती :-
  १)   प्रथम खसखस चांगली भाजून घ्यावी .  सुकं खोबरंही भाजून घ्यावं .  कांदे चरून घ्यावे .
  २)   भोपळ्याच्या सालीसकट मोठ्या फोडी कराव्यात .  खसखस , सुकं खोबरं ,  लसूण , आलं आणि चिरलेला कांदा वाटून घ्यावं .
  ३)   पाव वाटी तेलावर वाटण चांगलं परतावं .  भोपळ्याच्या फोडी या वाटणात परतून त्यात दोन-तीन वाट्या पाणी घालावं . 
  ४)   रश्श्याला उकळी आल्यावर त्यात तिखट , मीठ घालावं .  मग मंद आचेवर ठेवून भाजी चांगली शिजू द्यावी . 
  ५)   भाजीचा लगदा होईल इतकी शिजवू नये .  फोडीची पाठ करकरीत राहिली   पाहिजे .
  ६)   तिखट फोडणीत घालू नये , नंतर घातल्यास त्याची चवही छान लागते आणि भाजीला रंगही छान येतो .
  ७)   भाजी अर्धवट शिजल्यावर त्यात निम्मी कोथिंबीर घालावी .  भाजी पूर्ण शिजल्यावर उरलेली कोथिंबीर त्यावर पेरावी .
  (ही भाजी करताना कुणी त्यात गरम मसालाही घालतात .  पण तो नाही घातला तरी भाजी चवदार होते .)
  ४)   , लसूण तसंच परतलेला कांदा घालावा . 
  ५)   हे सारण तयार झाल्यावर त्यात हळद , तिखट , (धने-जिरं न घातल्यास गरम मसाला) मीठ चवीपुरत घालावं .
  ६)   हे सारण प्रत्येक ढेमशात भरावं .  त्यानंतर पसरट भांड्यात किंवा प्रेशरपैनमध्ये अर्धी वाटी तेल घालावं . 
  ७)   तेल गरम झाल्यावर मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी आणि पैन अथवा भांड्यात एक-एक ढेमसं , त्याचं तोंड वरच्या दिशेला असेल असं ठेवावं .  त्यात पाणी आजिबात घालू नये .
  ८)   प्रेशर पैनमध्ये मंद आचेवर पाच-सहा मिनिटात भाजी शिजते .  त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास भाजी खूपच लगदा होते .
  ९)   साध्या भांड्यात जिव्हा भाजी करायची असेल तेव्हा भांड्यात वरीलप्रमाणेच ढेमसे ठेवून त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावं . 
  १०)   म्हणजे भाजी शिजण्यास मदत होते .  भाजीत पाणी घालू नये , तसचं भाजी हलवू नये .
 •    ढेमश्याची भरून भाजी

  साहित्य :-
  १)   पाव किलो छोटे ढेमसे (याला मराठवाड्यात दिलपसंद म्हणतात)
  २)   खसखस दोन चमचे
  ३)   तील तिने चमचे
  ४)   सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी (छोटी)
  ५)   मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन
  ६)   गरम मसाला दोन चमचे
  ७)   तेल अर्धी वाटी , हळद , तिखट , लसूण पाकळ्या पाच-सहा
  (गरम मसाल्याऐवजी धन्या-जीऱ्याची पूड एक-एक चमचा , आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घालता येते .)
  कृती :-
  १)   प्रथम ढेमसे धुवून त्याच्या देठाकडील भागावर छोटासा गोल छेद देवून आतल्या बिया आणि गर काढून टाकावा .
  २)   कांदा बारीक चिरून तो तेलावर गुलाबीसर परतून घ्यावा .  खसखस , तीळ खोबरं  वेगवेळ भाजावं .  एकत्र वाटावं .
  ३)   वाटतांना त्यात धने , जिरं , लसूण तसंच परतलेला कांदा घालावा . 
  ४)   हे सारण तयार झाल्यावर त्यात हळद , तिखट , (धने-जिरं न घातल्यास गरम मसाला) मीठ चवीपुरत घालावं .
  ५)   हे सारण प्रत्येक ढेमशात भरावं .  त्यानंतर पसरट भांड्यात किंवा प्रेशरपैनमध्ये अर्धी वाटी तेल घालावं . 
  ६)   तेल गरम झाल्यावर मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी आणि पैन अथवा भांड्यात एक-एक ढेमसं , त्याचं तोंड वरच्या दिशेला असेल असं ठेवावं .  त्यात पाणी आजिबात घालू नये .
  ७)   प्रेशर पैनमध्ये मंद आचेवर पाच-सहा मिनिटात भाजी शिजते .  त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास भाजी खूपच लगदा होते .
  ८)   साध्या भांड्यात जिव्हा भाजी करायची असेल तेव्हा भांड्यात वरीलप्रमाणेच ढेमसे ठेवून त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावं . 
  ९)   म्हणजे भाजी शिजण्यास मदत होते .  भाजीत पाणी घालू नये , तसचं भाजी हलवू नये .
  १०)   वीस-पंचवीस मिनिटांनी भाजी उतरवून भांड्यात काढताना ढेमसं अलगद काढावीत म्हणजे मसाला बाहेर येणार नाही .  वरून कोथिंबीर घालावी

 • तंदुरी गोबी  साहित्य
  १ कॉलीफ़्लॉवर
  १ वाटी दही
  १.५ चमचा तिखट
  १ चमचा धने पूड
  १/४ चमचा हळद
  १/४ चमचा जिरे पूड
  १/२ चमचा गरम मसाला
  १/४ चमचा तंदुरी मसाला
  १ चमचा चाट मसाला
  २ हिरव्या मिरच्या
  २ चमचे आल्याचे तुकडे
  १० लासुणाच्या पाकळ्या
  तेल
  मीठ चवीपुरते

  कृती
  कॉलीफ़्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात घालावे. ७ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. पाणी गाळून बाजूला ठेवणे.
  मिक्सरमध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि २ चमचे दही घालुन बारीक वाटणे.
  एका बावुलमध्ये वाटलेली पेस्ट, उरलेले दही, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, हळद, तंदुरी मसाला आणि मीठ घालुन ढवळणे.
  त्या मिश्रणात कॉलीफ़्लॉवरचे तुकडे खालून मिसळणे. फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास ठेवणे.
  तवा गरम करून त्यात थोडे तेल घालणे. कॉलीफ़्लॉवरचे तुकडे त्यावर पसरवून मध्यम आचेवर पूर्ण पणे होईपर्यंत शिजवणे. कॉलीफ़्लॉवरच्या तुकड्यांना परतवून दुसरी बाजू पूर्ण होईपर्यंत शिजवणे. असे सगळ्या बाजूला भाजून झाल्यावर ताटलीत काढणे.
  चाट मसाला शिंपडून पुदिना चटणी, कांदा आणि लिंबूबरोबर खायला देणे.
  टीप
  मी ५ मिनिटच कॉलीफ़्लॉवरचे तुकडे शिजवलेपण माझ्यामते ७ मिनिट बरोबर होईल.
  स्क्युवरमध्ये ३-४ तुकडे घालुन कॉलीफ़्लॉवरला बार्बिक्यू पण करू शकता

  ...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies...marathi recipies
 • पनीर पुदिना पराठा -Paneer Pudina Stuffed Paratha  साहित्य:

  १ कप गव्हाचं पीठ 
  १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  १-२  पुदिन्याची पाने
  १ टीस्पून तेल
  १/२ टीस्पून मीठ
  १/२ टीस्पून हळद
  पीठ मळण्यासाठी पाणी
  सारणासाठी-
  १७५ ग्रॅम पनीर
  ७-८ पुदिन्याची पाने
  २ टीस्पून आलं लसूण-हिरव्या मिरचीची  पेस्ट (१/२" आलं + ३ लसूण पाकळ्या+ २ हिरव्या मिरच्या)
  १/२ टीस्पून चाट मसाला
  मीठ चवीप्रमाणे
  पराठे भाजायला बटर किंवा तूप
  पराठे लाटण्यासाठी तांदळाचं पीठ


  कृती:
  १. गव्ह्याच्या पिठात हळद,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि १ टीस्पून तेल घालून एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून छान पोळीला लाटतो तितके मऊ पीठ मळून १-२ तास झाकून ठेवा.
  २. पुदिन्याची पाने,आलं,लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून बारीक पेस्ट करून घ्या. पनीर हाताने कुस्करून पनीरचा चुरा करून घ्या. त्यात हि पेस्ट,चाट मसाला आणि मीठ घालून हाताने छान कालवून घ्या.
  ३. पराठे लाटायच्या आधी मळलेले पीठ पुन्हा एकदा नुसतेच मळून घ्या. पीठाचे ( २ १/२" आकाराचे) ४ समान गोळे करा. सारणाचे ४ समान भाग करा. हाताने वळून लाडवा सारखे ( २ १/२"-३") गोळे करून घ्या.
  ४. पिठाची ५" व्यासाची  पुरी लाटून घ्या आणि मधोमध सारणाचा गोळा ठेवा. सारणाचा गोळा पुरीने सगळ्याबाजूनी  झाकून बंद करा  आणि तांदळाचं  पीठ लावून ७"-८" व्यासाचा  गोल पराठा अलगद लाटून घ्या.
  ५. तवा गरम करून बटरवर पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित  भाजून घ्या. गरम गरम पराठा रायत्या बरोबर सर्व्ह करा.  Paneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed ParathaPaneer Pudina Stuffed Paratha
 • लस्सी-Lassi  साहित्य:
   जाडसर थंड दही
   ताजी जाड मलई (फ्रेश क्रीम)
  टीस्पून मीठ
  साखर चवीप्रमाणे
  सजावटीसाठी पुदिन्याची पाने

  कृती:
  १. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडर वर छान घुसळून घ्या.
  २. लस्सी ग्लास मध्ये फुटभर उंचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
  ३. त्यावर पुदिन्याची पाने घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.  लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe.लस्सी-Lassi   marathi recipe. • साहित्य :-

  १. दोन वाट्या बेसन
  २. एक वाटी पिठी साखर
  ३. पाव वाटी दुध
  ४. दिड वाटी तूप
  ५. अर्धा चमचा वेलची पावडर
  ६. ५० ग्रॅम बेदाणे
  7. ५० ग्रॅम काजू
  कृती :-

  1) गॅसवर कढई ठेवुन त्यात तुप वितळु दया , मग त्यात बेसन घालावे.
  2) ढवळ्त राहावे, कढईला तळाशी करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
  चांगले खमंग होइपर्यन्त भाजावे, गॅस बन्द करावा.
  3)भांडे खाली उतरवुन घ्यावे. त्यात दुध घालावे. परत ढवळावे.वरील मिश्रण थंड झाले कि त्यात पिठी साखर +वेलची पावडर घालावे.
  हाताने चांगले एकत्र करावे आणि लाडु वळायला घ्यावे.
 • साहित्य :-

  १. पाव किलो जाड रवा,
  २. सव्वा मोठी वाटी नारळाचा चव,
  ३. पाव किलो साखर,
  ४. अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप,
  ५. पाव वाटी दूध,
  ६. पाच वेलदोड्यांची पूड,
  ७. आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून,
  ८. साखरेच्या निम्मे पाणी.

  कृती :-

  रवा गुलाबी रंगावर तूप घालून भाजावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा.
  आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल
  त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवावा.
  मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे.
  दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, बेदाणे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे.
  व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून बघावे.
  मिश्रण आळायला सुरुवात झालेली असेल.
  साधारण चार तासाने लाडू वळावेत.
 •  

  More Quick Links : Marathi Baby Names | Exploring Maharashtra | Answers | Marathi Vishwa | Marathi Festivals | Marathi Matrimony

  Copyright 2011-12 m4marathi.com